आमदार भास्कर जाधव यांना अटकपूर्व जामीन मंजूर

0

चिपळूण : शिवसेना नेते आ. भास्कर जाधव यांना सिंधुदुर्ग जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ दि. १८ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आ. भास्कर जाधव यांनी भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात जोरदार भाषण केले. यामुळे आ. जाधव यांच्यावर कुडाळ पोलिस ठाण्यात भाजप तालुकाध्यक्षांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यानुसार आ. जाधव यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या जामिनावर सोमवारी सुनावणी झाली व आ. जाधव यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. आ. जाधव यांच्यावतीने अॅड. नितीन केळकर व अॅड.ऋषिकेश थरवळ यांनी काम पाहिले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 02/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here