राजापूर शहरात उद्या भरणारा आठवडा बाजार रद्द

0

राजापूर : शहरातील तालीमखाना ते जवाहर चौक या मुख्य रस्त्याच्या कामामुळे या मार्गावरिल वाहतुक पुर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गुरूवारी ३ नोव्हेंबर रोजी शहरात भरणारा आठवडा बाजार भरणार नसल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली आहे.

रस्त्याच्या कामामुळे मुख्य रस्त्यावरिल वाहतुक बंद असल्याने केवळ या आठवडा बाजारापुरता हा निर्णय घेण्यात आला असून पुढील गुरूवार पासून आठवडा बाजार नियमिन भरेल असेही भोसले यांनी सांगितले. शहरातील तालीमखाना ते जवाहर चौक या मुख्य रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे तालीमखाना ते जवाहर चौक या मुख्य रस्त्यावरिल एसटी सह अन्य वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे. दुचाकी व अन्य वाहतुक ही वेगवेगळया पर्यायी मार्गाने सुरू आहे. मात्र गुरूवारी आठवडा बाजार भरविणे शक्य नसल्याने हा बाजार रद्द करण्यात आल्याचे भोसले यांनी सांगितले. रस्त्याच्या काम पुर्ततेसाठी नागरीक, वाहन चालक यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. तरी जनतेने सहकार्य करावे असे आवाहनही भोसले यानी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here