सीएनजी गॅसचा दर 3 रुपयांनी कमी, अशोका गॅस कडून दिलासा

रत्नागिरी : १ मे २०२० पासून अशोका गॅस या सी.एन.जी. वितरक कंपनी कडून आपल्या सी.एन.जी. चा दर प्रति किलो ३ रुपयाने कमी करण्यात आला आहे. सुधारित दरानुसार आता सी.एन.जी. रुपये ५६ प्रति किलो या दराने उपलब्ध आहे. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साधारण २००० रिक्षा सी.एन.जी. इंधन स्वरूपात वापरतात, तर एकूण ११ सी.एन.जी. पंप अशोका गॅस यांचे सुरू आहेत. वर्षभर विविध सवलती व योजना अशोका गॅस यांचा मार्फत रत्नागिरी मधील रिक्षा व्यावसायिकांनी देण्यात आल्या आहेत. महागाईचा काळात सी.एन.जी. चा दर कमी केल्याबद्दल सर्व स्तरावरून आभार मानले जात आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here