नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे उर्वरित पेपर रद्द करण्यात आलेले नसून कोरोनाचा संसर्ग संपल्यानंतर त्याबाबतचे वेळापत्रक जारी करण्यात येईल, असा खुलासा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केला आहे. बोर्डाच्या सुधारित परीक्षेच्या तारखांच्या आधी १० दिवस याची पूर्वकल्पना शाळा, विद्यार्थी आणि पालकांना देण्यात येईल, असेही मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
