जिल्ह्यातील दोन अधिकारी व तेरा कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त

रत्नागिरी (सौरभ मालूष्टे) : पोलीस खात्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दर वर्षी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येते. या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील दोन अधिकारी श्री अनिल लक्ष्मण लाड, (पोलीस निरीक्षक-शहर पोलीस स्थानक रत्नागिरी) व श्री चंद्रकांत गणपत लाड (सहाय्यक पोलीस निरीक्षक) यांना मिळाले आहे. तसेच जिल्ह्यातील 13 पोलीस कर्मचाऱ्यांना ही पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह प्राप्त झालेला आहे.
▪️ (सहायक पो उपनिरीक्षक) – श्री दीपक तुकाराम साळवी, श्री अनिल सदाशिव मोरे.

▪️ (पोलीस हवालदार) -श्रीमती मेधा रविंद्र बोन्द्रे, दीपक कांशीराम जाधव, रमेश रतन चव्हाण, किशोर रघुनाथ जोशी, उदय संभाजी भोसले, संतोष यशवंत सावंत, घनश्याम गोविंद वाघाटे.

▪️ (पोलिस नाईक) -सागर चंद्रकांत साळवी, विजय तान्हाजी आंबेकर, संजय गोपाळ वाघाटे, संदीप सुरेश नाईक

सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी व कर्मचारी याना सेवेत 15 वर्ष पूर्ण तसेच क्लिष्ट व थरारक बहुचर्चित गुन्ह्याची उकल करून खटले दाखल करणे, जनतेचे समस्या सोडवून पोलिसांची प्रतिमा उजळ करणे आशा विविध कामगिरी साठी देण्यात आलेले आहे. सन्मानचिन्ह प्राप्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्व थरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here