खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचा ८ रोजी वर्धापन दिन

0

खेड : तालुका ज्येष्ठ नागरिक संघ खेडचा दहावा वर्धापन दिन कार्यक्रम मंगळवार दि. ८ रोजी श्री.द.ग.तटकरे सभागृहात सकाळी १०.३० वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात ज्या सभासदांचे वय ७५ व त्याहून अधिक आहे, त्यांचे सत्कार करण्यात येणार आहेत. तसेच अहवाल पुस्तक छपाई संदर्भात चर्चा, वर्गणी, सभासद वाढ करणाऱ्या सभासदांचा भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात येणार आहे. तरी सर्व ज्येष्ठ सभासद बंधू, भगिनींनी या वर्धापनदिनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संघाचे सहसचिव इकबाल फकीह यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here