लॉकडाऊन काळात एलपीजी सिलेंडर स्वस्त

नवी दिल्ली : देशव्यापी लॉकडाऊन आणि मे महिन्याच्या पहिल्या तारखेलाच सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील इंधन मार्केटिंग कंपन्यांनी (एचपीएल, बीपीसीएल, आयओसी) विना सबसिडीच्या एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी घट केली आहे. 14.2 किलोच्या विना सबसिडी गॅस सिलेंडरचे दर दिल्ली येथे 162.5 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे नव्या किंमतीत घट होऊन सिलेंडरचे दर 581.50 रुपयांवर आले आहे. तसेच 19 किलोच्या सिलेंडरचे दर 1029.50 आहे. आयओसीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली येथे 14.2 किलोचे विना सबसिडी सिलेंडरच्या किंमतीत घट होऊन 581 रुपयांवर आले आहे. आधी या सिलेंडरचे दर 744 होते. तर कोलकाता येथे 584.50 रुपये, मुंबईत 579.00 रुपये आणि चेन्नईमध्ये 569.50 रुपये दर नोंदवले गेले आहेत. आधी अनुक्रमे 774.50, 714.50 रुपये आणि 761.50 रुपये इतके गॅस सिलेंडरचे दर होते.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here