आम्ही मविआचा करेक्ट कार्यक्रम केला : देवेंद्र फडणवीस

0

सोलापूर : मी सांगितलं होतं मी पुन्हा येईन. 106 वा आमदार द्या करेक्ट कार्यक्रम आम्ही करतो, असे म्हटलो होतो. बोलल्याप्रमाणे आम्ही मविआचा करेक्ट कार्यक्रम केला आणि तुमच्या आशीर्वादाने, पांडुरंगाच्या आशीर्वादाने सरकार आले, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआला टोला लगावला. सोलापूरच्या मंगळवेढ्या आवताडे शुगर्स प्रथम गळीत हंगाम शुभारंभ व शेतकरी मेळाव्यात ते बोलते होते.

सुधाकर परिचारक हे निवडणुकीला उभे होते आणि त्यावेळी मी एक सभा घेण्यासाठी आलो होतो. 24 गावांना पाणी देणारी मंगळवेढा उपसा सिंचन योजना ही मी करणार, असे त्या सभेत आश्वासन दिले. ते आश्वासन दिल्यानंतर सरकार गेलं. पण मी सांगितलो होतो मी पुन्हा येईन आणि तुमची योजनाही मी पुन्हा येण्याची वाट पाहत बसली. मधल्या सरकारने फाईल सरकरवलीही नाही. पुन्हा तुमच्या आशीर्वादाने तुम्ही समाधान दादांना निवडून दिले. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जे सांगितले होते की 106 वा आमदार द्या करेक्ट कार्यक्रम आम्ही करतो. आम्ही करेक्ट कार्यक्रम केला आणि तुमच्या आशीर्वादाने, पांडुरंगाच्या आशीर्वादाने सरकार आलं. सरकार आल्याबरोबर आपण या योजनेला मोठ्या प्रमाणात गती दिली, असे फडणवीस म्हणाले.

गोरगरीब जनता, कष्टकरी व शेतकऱ्यांवर येणारी संकटे दूर होऊन तो सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी शक्ती आणि आशीर्वाद द्यावा, असे साकडे विठ्ठलाच्या चरणी घातल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:41 PM 04/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here