आजपासून तुळशी विवाहाला प्रारंभ

0

कार्तिक शुद्ध द्वादशीपासून घरोघरी तुळशीच्या विवाहाची लगबग सुरु होते. कार्तिक पौर्णिमेपर्यंत अर्थात त्रिपुरी पौर्णिमेपर्यंतच्या काळात तुळशीचा विवाह करता येतो.

परंतु प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह केला जातो. अगदी घरच्या विवाह समारंभाप्रमाणे अंगणातील तुळशीचा विवाह केला जातो. तुळशी विवाहानंतर लग्नाच्या मुहूर्तांनाही सुरुवात होते. आजपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाहाचा मुहुर्त असतो.

तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त :
पंचांगानुसार तुळशीचे लग्न आजपासून सुरु होतील. 8 नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे तुळशी विवाह साजरे केले जातील. यंदा 8 नोव्हेंबरला संध्याकाळी 4 वाजून 31 मिनिटांपर्यंत कार्तिक पौर्णिमा असणार आहे. तसेच विवाहाची वेळ सायंकाळी असणार आहे.

तुळशी विवाह पूजा विधी :
तुळशी विवाहासाठी पाटावर आसन टाकून तुळस आणि शाळीग्राम मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. पट्टभीवती ऊस किंवा केलुयाच्या पानांचा मंडप सजवा आणि कलश बसवा. सर्वप्रथम कलश आणि गौरी गणेशाची पूजा करावी. यानंतर माता तुळशीला आणि भगवान शालिग्रामला धूप, दिवा, वस्त्र, माळा, फुले अर्पण करा. तुळशीला श्रृंगार आणि लाल ओढणी अर्पण केली जाते. असे केल्याने सुखी वैवाहिक जीवनाचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते. यानंतर तुलसी मंगाष्टक पठण करून भगवान विष्णू आणि तुळशीची आरती करावी. पूजेनंतर प्रसाद वाटावा. या पूजेमध्ये मुळा, रताळे, पाणी तांबूस, आवळा, मनुका, मुळा यांसह कोथिंबीर पेरू आणि इतर हंगामी फळे अर्पण करा.

तुळशी विवाहाची अख्यायिका
पौराणिक कथेनुसार, एकदा माता तुळशीने भगवान विष्णूंना क्रोधाने शाप दिला की ते काळा दगड होतील. या शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी देवाने शालिग्राम पाषाणाच्या रूपात अवतार घेतला आणि तुळशीशी विवाह केला. दुसरीकडे तुळशीला देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते. अनेकजण एकादशीला तुळशीविवाह करत असले तरी कुठेतरी तुळशीविवाह द्वादशीच्या दिवशी होतो. अशा परिस्थितीत तुळशी विवाहासाठी एकादशी आणि द्वादशी या दोन्ही तिथींची वेळ निश्चित करण्यात आली आहे.

कार्तिकी एकादशीपासून मंगलकार्यांची सुरुवात
तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी वृंदावन फुलांनी सुशोभित केले जाते. त्याच्या मुळाशी चिंचा, सिताफळे, बोरं आणि आवळे ठेवली जातात. मांडवाच्या रुपात त्यास उसाच्या खोपटांनी सजवले जाते. तुळसीच्या मुळापाशी बाळकृष्णाची मुर्ती ठेऊन मंगलाष्टके म्हणून त्याचा तुळशीसोबत विवाह लावला जातो. त्यावेळी तुळशीचे कन्यादान केले जाते. नंतर तिची आरतीही केली जाते. आपल्या घरच्या कन्येला श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा हेतू त्यामागे असतो. त्यानंतर प्रसादाचे वाटप केले जाते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 AM 05/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here