देवरुखात घराला आग लागून ४ लाखांचे नुकसान

0

देवरुख : शहरातील मौजे पर्शरामवाडी येथे गुरुवारी रात्री ८.३० वाजता कमलाकर राघो पर्शराम यांच्या घराला आग लागून ४ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद तहसीलदार कार्यालयात करण्यात आली आहे.

मात्र, घराला आग लागल्याचे कारण समजू शकले नाही. गुरुवारी पर्शराम यांच्या घरातील एक वृद्ध महिला वगळता सर्वच शेतात भात कापणीसाठी गेले होते. ८.३० घराच्या छपरातून धूर येवू लागला. यामुळे महिला घरातून बाहेर पडली अन आरडाओरड केली. या आवाजाने शेजारी यांनी पर्शराम यांच्या घराला आग लागल्याचे पाहून आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आग फोफावत गेली. यात कपडालत्ता, सामान, धान्य जळून खाक झाले.

आगीची माहिती मिळताच नगरपंचायत, पोलीस यंत्रणा, राजू काकडे हेल्प अॅकॅडमी यांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्याचे काम केले. सुदैवाने या आगीत मनुष्यहानी झाली नाही. या बाबत शुक्रवारी तलाठी यांनी पंचनामा केला असता ४ लाख १० हजार रुपये नुकसानाची नोंद करण्यात आली. घराच्या छपरावरुन आग लागल्याने आगीचे कारण समजू शकले नाही.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 05/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here