न्यूयॉर्क: जगभरात कोरोनानं थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. सध्या जगभरात 32 लाख 56 हजार 846 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 2 लाख 33 हजार 388 लोकांचा मृत्यू झाला आहे. 10 लाख लोकं निरोगी झाली आहे. मृतांमध्ये पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. एकट्या अमेरिकेत 63 हजार 733 लोकांचा मृत्यू झाला आहे. अशी परिस्थिती असली तरी, अजूनही जगात असे 33 देश आहेत, जेथे कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही आहे. आश्चर्य वाटेल, पण खरंच असे देश आहेत. डिसेंबरमध्ये चीनच्या वुहानपासून जगभरात पसरलेल्या या व्हायरसने 190 देशांमध्ये थैमान घातला आहे. मात्र गेल्या 2 महिन्यांत कोमोरोस, लेसोथो, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि पॅसिफिकमधील नऊरू, किरीबाती आणि सोलोमन बेटे यांसारख्या दूरदूरच्या बेटांसह एकूण 33 देशांमध्ये एकही कोरोना रुग्ण सापडलेला नाही आहे. रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार 20 एप्रिल पर्यंत संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेल्या 247 देशांपैकी 214 देशांमध्ये किमान एक कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. यापैकी 186 देशांमध्ये कोरोनाचे कम्युनिटी ट्रान्समिशन होत आहे. यापैकी 162 जणांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान काही देशांनी संसर्गाची नोंद किंवा अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की, या देशांमध्ये कोरोनाची एकही प्रकरणे नाही आहेत. उदाहरणार्थ, उत्तर कोरियाने कोरोनाव्हायरसची कोणतीही नोंद केलेली नाही परंतु ती चीन, रशिया आणि दक्षिण कोरिया यांच्या बरोबरीने आहे, सर्व देश मोठ्या संख्येने प्रकरणे हाताळत आहेत. दरम्यान काही तज्ज्ञांच्या मते कोरोना आता अमेरिका, युरोपातून आशिया आणि आफ्रिका खंडात पसरणार आहे. युरोपमध्ये फेब्रुवारीच्या उत्तरार्धात कोरोनाचा प्रसार अधिक झाला. दरम्यान काही वैज्ञानिकांच्या मते कोरोनामुक्त होण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागण आहे.तर, आतापर्यंत पाच देशांनी कोरोना हरवत हे देश व्हायरसपासून मुक्त झाली आहेत. यात अँगुइला, ग्रीनलँड, सेंट बार्त्स आणि सेंट लुसिया, आणि येमेनचे कॅरिबियन बेट आहेत.
