मुंबई : आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण असा दिवस आहे. आज १०७ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र अस्तित्त्वात आला. म्हणून १ मे हा दिवस महाराष्ट्रात ६० वा महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. या दिनानिमित्त महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन होते. मात्र यंदा जगभरात कोरोना व्हायरसचे सावट असल्यामुळे लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. त्यामुळे घरात राहूनच नागरिकांनी हा दिवस साजरा करावा अशे सांगण्यात येत आहे. या महान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांचा उत्साह वाढविण्यासाठी खास मराठी भाषेत ट्विटरवरुन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. नरेंद्र मोदी आपल्या यांनी आपल्या ट्विट मध्ये ‘जय महाराष्ट्र’ चा नारा देत महाराष्ट्र वासियांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.या ट्विटमध्ये देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान आहे. येणाऱ्या काळात राज्याच्या प्रगती आणि संपन्नतेसाठी मी प्रार्थना करतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
