मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधत जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, ‘जनता ही राज्य आणि देशाची संपत्ती आहे. ३ मे नंतर लॉकडाऊनचं काय हा प्रश्न विचारला जात आहे. त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. अर्थचक्र रुतलं मान्य, पण तुम्ही सगळे नागरिक ही राज्याची संपत्ती आहे. जनता वाचली पाहिजे. ऑरेंज, ग्रीनमध्ये अटी-शर्तींसह व्यवहारांना परवागनी दिली आहे. ऑरेंज झोनमधली काही जिल्ह्यांमध्ये काय करु शकतो याचा विचार सुरु आहे. ग्रीन झोनमधल्या अटी-शर्ती हळूहळू काढत आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ३ तारखेनंतर आपण आतापेक्षा अधिक मोकळीक देणार आहोत, झोननुसार मोकळीक दिली जाईल, पण झुंबड-घाई-गडबड नको, अन्यथा पुन्हा बंधनं टाकावी लागतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:12 PM 01-May-20
