धक्कादायक : रेडझोन मध्ये होणारी आंब्याची घरपोच विक्री ठरू शकते रत्नागिरीकरांसाठी धोकादायक

रत्नागिरी : शेतमालाच्या नावाखाली मुंबई, पुणे सारख्या रेड झोन मध्ये रत्नागिरीतून आंब्याची घरपोच विक्री केली जात आहे. सोसायटीमधून २० पेट्यांची मागणी असल्यास प्रती पेटी २०० रुपये वाहतूक दर आकारून हा माल मुंबई, पुणे या कोरोनाच्या रेड झोन मध्ये घरपोच केला जात आहे. हा माल गाडीवरील ड्रायव्हर, क्लीनर प्रत्येकाच्या घरात नेऊन पोहोच करीत असल्याचे बोलले जात आहे. गावाहून माणूस आल्यावर त्याचे आदरातिथ्य करून चहापाणी केले जात असल्याची माहिती मिळत आहे. हेच चालक आणि मदतनीस पुन्हा रत्नागिरीत येत असल्याचे बोलले जात आहे. कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात होऊ नये म्हणून कऱ्हाड मार्गे येणारी भाजीपाल्याची वाहतूक देखील प्रशासनाने बंद केली आहे. मग रेड झोन मध्ये जाऊन येणाऱ्या चालक व मदतीनिसापासून कोरोना संक्रमणाचा धोका नाही का ? असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. जिल्ह्यातील गुहागरमध्ये अशा चालकांना कॉरंटाईन करण्यात आलंय मग इतरत्र हि कारवाई का होताना दिसत नाही असा प्रश उपस्थित झाला आहे. रत्नागिरीकरांनी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करून व जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या मेहनतीमुळे आज रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे मात्र अशा गलथानपणामुळे पुन्हा जिल्हा संकटात येऊन त्याचा त्रास येथील नागरिकांना भोगावा लागू शकतो अशी शक्यता आता निर्माण होत आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
02:23 PM 01/May/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here