मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका घेण्यास मंजुरी दिली असून आयोगाच्या या निर्णयाचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वागत केलं आहे. आज महाराष्ट्र दिन आहे आणि निवडणूक आयोगानं विधान परिषदेच्या निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. हा महाराष्ट्रासाठी शुभ संकेत आहे, असं सांगतानाच काल काय झालं हे महत्त्वाचं नाही. आजपासून नवा अध्याय सुरू झाला आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. आता राज्यातील बरेच आत्मे शांत झाले असतील, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या तिढ्यामुळे महाराष्ट्रात अनिश्चिततेचे वातावरण होते. ते आता थांबेल’, असे त्यांनी म्हटलं आहे.
