विधी सेवा समितीच्यावतीने मंडणगड येथे कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर

0

मंडणगड : पॅन इंडिया अंतर्गत तालुका विधी सेवा समिती दापोली मंडणगड यांच्यावतीने 5 नोव्हेंबर 2022 रोजी मंडणगड येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन मंडणगड येथे करण्यात आले होते.

या शिबिरास दापोली न्यायालयाच्या सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती महाडिक मॅडम, मंडणगड तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अँड. मिलिंद लोखंडे यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लाभली. शिबिरास उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्रीमती महाडिक यांनी लोक अदालत व मेडिएशन संकल्पना समाजावून सांगितली, अँड. मिलींद लोखंडे यांनी कुळ कायदा या बाबत माहिती सांगितली.

कार्यक्रमास मंडणगड येथील ज्येष्ठ वकील सौ सोनल बेर्डे, श्री गद्रे, श्री.धनजंय करमरकर, श्री सुमेश घागरुम, श्री महाजन व सोविलकर आणि पक्षकार उपस्थित होते. पॅन इंडिया अंतर्गत या शिबिराचे आयोजित करण्यात आले होते यावेळी विधी सेवा समिती च्या कार्याची माहिती श्री तेरेदेसाई यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here