मुंबई : शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचे समोर आले आहे.
यावरुन आता राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर पन्नास खोकेवरुन टीका केली होती, या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवी दिली असल्याचे समोर आले आहे, यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेले वक्तव्य गांभीर्याने केले घेतले आहे. मुख्यमंत्र्यांनी सत्तार यांना फोनवरुन खडे बोल सुनावले आहेत. सुप्रिया सुळे यांची माफी मागण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती मिळत आहे.
यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व प्रवक्त्यांची एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत प्रवक्त्यांना माध्यमांशी कोण बोलणार यावर चर्चा करण्यात येणार आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
06:00 PM 07/Nov/2022