माधवबागतर्फे मोफत आरोग्य शिबिर

0

चिपळूण : जागतिक मधुमेह दिनानिमित्त चिपळुणातील माधवबाग यांच्यावतीने २० नोव्हेंबरपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

माधवबाग आयुर्वेदिक कार्डिोंक केअर क्लिनीक यांच्यामार्फत या शिबिराला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये नाडी परीक्षण, हृदयाचे ठोके, रक्तदाब, मधुमेह, ऑक्सिजनचे प्रमाण, प्रकृती परीक्षण, उंची, वजन, आहार नियोजन या बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सहभागी गरजुंची तपासणी करण्यात येणार असून, शिबिरामध्ये आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. राधा मोरे, डॉ. माधव सोमण, डॉ. मयुरी जाधव मार्गदर्शन करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here