खेडशीतील ग्रामस्थांनी घेतला मोफत आरोग्य तपासणीचा लाभ

0

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सात दिवसीय श्रमसंस्कार निवासी शिबिरात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने खेडशी गावातील ग्रामस्थ तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. ग्रामस्थांनी त्याचा लाभ घेतला.

आरोग्य शिबिरात रक्त तपासणी, ब्लड प्रेशर आणि नेत्र तपासणी यांचा समावेश होता. तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉ. अमरजित चव्हाण, डॉ. प्रनोती काशिद, डॉ. स्वप्नील भोसले, समुपदेशक राम चिंचोले, रामेश्वर म्हेत्रे, प्राची जाधव, सामजिक कार्यकर्त्या श्वेता चव्हाण, हिंद लॅब जिल्हा समन्वयक श्वेता शिंदे, लॅब टेक्निशियन कोमल पाटील, लॅब समन्वयक शुभम पवार, नेत्राचिकित्सक निकिता नाचणकर, खेडशी गावच्या सरपंच जान्हवी घाणेकर, खेडशी हायस्कूलचे शिक्षक सुभाष पाटील, राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्पाधिकारी प्रा. हरेश केळकर, सहाय्यक प्रकल्पाधिकारी ऋतुजा भोवड, प्राध्यापक, स्वयंसेवक आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here