चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक केले आहे अन्यथा ५०० रुपये दंड वसूल केला जाईल, अशी घोषणा केली आहे. याची चिपळूण नगर परिषदेने अंमलबजावणी सुरू केली असून गुरुवारी १० लोकांवर कारवाई करीत ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामुळे आता विना मास्क फिरणे तोट्याचे होणार आहे, तरी नागरिकांनी जागरूक व्हावे, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
