‘भारत जोडो’ यात्रेचा आज महाराष्ट्रातील तिसरा दिवस

0

मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रातील तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसातील पहिलं सत्र सकाळी सहाला सुरु झालं आहे.

गुलाबी थंडीत राहुल गांधी यांनी सहा वाजता ही यात्रा सुरू केली आहे. शंकरनगर ते पुढे नायगाव लॉन्स या ठिकाणी पहिला टप्पा असणार आहे. चार वाजल्यानंतर दुसरं सत्र सुरु होणार आहे. सध्या राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चालतात. इतर नेतेही त्यांच्यासोबत चालत आहेत.

कन्याकुमारी येथून सुरु झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे. हजारो मशाल हाती घेऊन खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वतात निघालेली ही यात्रा सोमवारी रात्री महाराष्ट्रात नांदेडमधील देगलूर येथे दाखल झाली आहे. यावेळी त्यांच्या सोबत हजारो काँग्रेसचे कार्यकर्ते होते, ज्यांच्या हातात मशाली होत्या. या यात्रेचं काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात जंगी स्वागत केले.

सकाळी 8.30 वाजल्यापासून राहुल गांधी यांची पदयात्रा गुरुद्वारापासून सुरू झाली. राज्यातल्या नांदेड,हिंगोली,वाशीम,अकोला आणि बुलढाणा अश्या ५ जिल्ह्यातून 14 दिवस हि यात्रा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. अकोला जिल्ह्यातील यात्रा मार्गांवर राहुल गांधी कारने प्रवास करणार आहेत.

या यात्रेत आघाडीतले शरद पवार आणि उध्दव ठाकरे हे दोन नेते सहभागी होणार की नाही याची चर्चा सूरू आहे. बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सध्या आजारी असलेले शरद पवार या यात्रेत सहभागी होणारं आहेत. शिवसेनेने मात्र ठाकरे पिता पुत्राच्या सहभागाबाबतचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे.

देगलूरहून ही यात्रा निघाल्यानंतर देगलूर ते नांदेड हा मार्ग 7 ते 12 नोव्हेंबर 5 दिवस हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. नांदेड मधील जवळपास 9 मार्गावरील वाहतूकही वळवण्यात आली आहे. यात्रा सुरळीत व्हावी यासाठी 300 अधिकारी, दीड हजार पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील रस्ते साफसफाई तसेच प्रमुख रस्त्यावरील दुभाजकांना रंगरंगोटीचे काम केले जात आहे. मागील आठ दिवसापासून दोन एकर खुल्या मैदानाची सफाई करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:55 AM 09/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here