सांगलीत खून, मृतदेह पोत्यातून नदीत टाकला

सांगली : येथील कृष्णा नदीपात्रात बंधार्‍याच्या बाजूला एका पोत्यात अंदाजे ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत जीवरक्षक टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेहाच्या गळ्यावर वार दिसून आल्याने खून करून मृतदेह नदीत टाकण्यात आल्याचे स्पष्ट झाले. मृतदेह तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात नेण्यात आला असून मृताच्या हातात व पायात काळा दोरा असून काळी पॅन्ट व चौकडा शर्ट असा पेहराव आहे. इतर ओळखीची कोणताही पुरावा आढळून आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपासाच्या सूचना दिल्या आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here