पोलिस अधीक्षक कार्यालय येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

रत्नागिरी : छावा प्रतिष्ठान रत्नागिरी व जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने व नंदादीप आय केअर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराला पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून नेत्र तपासणी शिबिर नुकतेच संपन्न झाले. यावेळी एकूण १२१ पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी आपला सहभाग नोंदविला.

यावेळी रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक, अधिकारी, कर्मचारी तसेच छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चे अध्यक्ष सुनील धावडे, सचिव समीर गोताड, संघटक समीर धावडे, सदस्य चंद्रकांत गोताड, नंदादीप आयकेअर हॉस्पिटलकडून अक्षय विलणकर, ओमकार शिंदे, नूर अमिन, प्रिया मोंडे व पूर्वा मयेकर इ. उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here