अतिमद्य सेवनाने घेरा रसाळगड येथील एकाचा मृत्यू

0

खेड : तालुक्यातील घेरा रसाळगड गावातील निमणीची वाडी येथील 45 वर्षीय तरुणाचा अतिमद्य सेवनाने मृत्यू झाला. गणेश शांताराम जाधव असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

घेरा रसाळगड निमणीची वाडी येथील गणेश शांताराम जाधव याला दारुचे व्यसन होते. सोमवारीही त्याने मोठ्या प्रमाणात दारू ढोसली होती. दारूच्या नशेतच असलेल्या गणेश याचा देवघर-वगळवाडी येथे पडल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याचा भाऊ अनिल जाधव याने याबाबत पोलिसांना खबर दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. खेड पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली असून अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 09/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here