जगदंबा तलवार ब्रिटनमधून परत आणण्यासाठी प्रयत्न करणार : सुधीर मुनगंटीवार

0

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ब्रिटनमधून परत आणण्यासाठी केंद्र सरकारमार्फत ब्रिटन सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे.

या माध्यमातून २०२४ पर्यंत तलवार महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिली. जगदंब तलवार ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पुजेची तलवार असल्याची माहिती इतिहासात नोंद आहे.

मुनगंटीवार म्हणाले की, भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे नुकतेच ब्रिटनचे पंतप्रधान झाल्याने त्यांच्याशी बोलणी सुरू झाली आहे. राज्य सरकारने केंद्रामार्फत जगदंबा तलवार महाराष्ट्राला देण्याची मागणी केली आहे. शिवराज्याभिषेकाला २०२४ मध्ये ३५० वर्षे पूर्ण होतील. त्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून आम्ही एक आराखडा तयार करत असून यावेळी जर जगदंबा तलवार भारतात परत आली तर आमचा आनंद द्विगुणित होईल. तसं झालं तर ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब ठरेल, असेही ते म्हणाले.

साधारणपणे १८७५ ते १८७६ च्या दरम्यान ही तलवार महाराष्ट्रातून ब्रिटनला गेली. तत्कालीन प्रिन्स भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांना काही भेटवस्तू देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये जगदंबा तलवारीची समावेश होता.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 11/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here