चिपळूण व संगमेश्वरमध्ये कोरोना रुग्ण सापडले
रत्नागिरी : जिल्ह्यात नवे २ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. चिपळूणमध्ये रात्री १ रुग्ण पॉझिटीव्ह मिळाला असतानाच संगमेश्वरमध्येही १ रुग्ण पॉझिटीव्ह मिळाला आहे, असे एकूण २ रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे. संगमेश्वर येथील व्यक्ती ठाणाहून प्रवास करून आला होता. आता या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्याला सज्ज व्हावे लागणार आहे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
9:46 AM 02-May-20
