यावर्षीच्या शाळांच्या फी वाढीबद्दल लवकरच निर्णय जारी होणार

मुंबई : लॉकडाउनमुळे अनेक पालकांचे उत्पन्न बुडाले आहे, अनेक पालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे यंदा शाळांनी फी वाढ करू नये, अशी मागणी पालकांकडून होत होती. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर यांनीही याबाबत सरकारकडे पत्राद्वारे मागणी केली होती. या मागणीनंतर, यंदा शाळांनी फी वाढ करू नये यासाठी शिक्षण विभाग लवकरच निर्णय जारी करणार आहे, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. राज्य मंडळाच्या शाळांना हा निर्णय बंधनकारक असणार आहे. सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी बोर्डाच्या शाळांनाही फी वाढ करू नये, यासाठी या मंडळाच्या अध्यक्षांशी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड स्वत: चर्चा करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना यामुळे मोठा दिलासा मिळू शकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here