मुंबई : राज्यात कोरोनाचा हाहाकार मजला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सतत जनतेशी संवाद साधत आहे. कोरोनाविषयी माहिती, याचप्रमाणे नागरिकांच्या मनातील भीती मुख्यमंत्री ठाकरे हे घालवत असतात. याचाच धागा पकडत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी देखील मुख्यमंत्री ठाकरे यांचे कौतुक केलं आहे. शुक्रवारी जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘लोकांना लक्षणं दिसली तर अंगावर काढू नका असं आवाहन करताना कोरोनाचा रुग्ण लवकर आला तर लवकर बरा होतो’, याच पार्श्वभूमीवर लतादीदींनी म्हंटलं आहे की, ”उद्धवजींनी सांगितले की, या आजारातून वेगवेगळ्या वयोगटातले अनेक लोक बरे होत आहेत, हे ऐकुन समाधान वाटले, ज्याप्रमाणे ते भीती घालवत आहेत, या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जात आहेत, हे खरंच कौतुकास्पद आहे.”
