मुंबई : देशव्यापी लॉकडाउनचा कालावधी आणखी १४ दिवसांनी वाढवताना, ग्रीन झोनमध्ये मद्य तसेच पान आणि तंबाखूच्या विक्रीला सोमवार, ४ मे पासून काही निर्बंधांसह परवानगी देण्याचा निर्णय मोदी सरकारने शुक्रवारी घेतला. मद्य आणि पान-तंबाखूची खरेदी करताना ग्राहक एकमेकांपासून किमान सहा फूट अंतरावर उभे राहतील आणि दुकानात एकावेळी पाचपेक्षा जास्त लोक नसतील. सार्वजनिक ठिकाणी मद्य आणि पान-तंबाखू सेवनाची परवानगी नसेल, असेही या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, मद्यदुकाने व सिगारेट, पान तंबाखू विकणाऱ्या दुकानांना खुली करण्यासाठी घालण्यात आलेल्या अटी व शर्तींचा नीट अभ्यास करून राज्यसरकार याबाबत निर्णय घेईल.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:25 AM 02-May-20
