द्रविड-रोहितला हटवण्याची हरभजन सिंगची मागणी

0

मुंबई : टीम इंडियाचा टी-२० विश्वचषक २०२२ मधील प्रवास सेमीफायनलमध्ये संपला. इंग्लंडविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात भारताला तब्बल १०गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. भारताच्या पराभवानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांना हटवण्याची मागणी होत आहे. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगही या यादीत सामील झाला आहे.

हरभजन सिंगने कर्णधार आणि प्रशिक्षकाऐवजी २ नवीन खेळाडूंची नावे सुचवली आहेत. तो म्हणाला, ‘राहल द्रविडच्या जागी आशिष नेहरासारखा कोणीतरी यायला हवा. नुकताच टी२० क्रिकेटमधून निवृत्त झालेला आशिष नेहरा माझा आवडता प्रशिक्षक असेल. रोहित शमएिवजी हार्दिक पंड्याला संधी द्यावी, असे मला वाटते.

सुनील गावसकर यांनीही पंड्याला टी-२० क्रिकेटचा पुढचा कर्णधार मानले आहे. ते म्हणाले, ‘इंडियन प्रीमियर लीगमध्ये जेव्हा त्याने पहिल्यांदा कर्णधारपद स्वीकारले तेव्हा त्याच्या संघाला विजय मिळवून दिल्यानंतर त्याने पुढील कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याचा निर्णय घेतला असता, भविष्यात पंड्या निश्चितपणे संघाची धुरा सांभाळेल आणि काही खेळाडू निवृत्त होतील.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here