येस बँक घोटाळा प्रकरण; वाधवान बंधूंच्या सीबीआय कोठडीत ८ मेपर्यंत वाढ

मुंबई : येस बँक घोटाळ्याशी संबंध असलेले डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल व धीरज वाधवान यांच्या सीबीआय कोठडीत ८ मे पर्यंत वाढ केली आहे. महाबळेश्वर येथे १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवल्यानंतर गेल्या रविवारी कपिल व धीरज वाधवान यांना ईडीने अटक केली. आधीची ईडी कोठडी संपल्यावर शुक्रवारी या दोघांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. वाधवान व कपूर यांच्यातील कट जाणून घेण्यासाठी वाधवान बंधुंची कोठडी मिळणे आवश्यक आहे, असे ईडीने विशेष न्यायालयाला सांगितले. १५० शेल कंपन्या वाधवानच्या नियंत्रणात आहेत. त्याची चौकशी करणे आवश्यक आहे. तसेच राणा कपूरच्या अनेक कंपन्या आहेत. कपूर आणि वाधवान यांच्या कंपनीचा एकमेकांशी काही संबंध आहे का? याचीही चौकशी करायची आहे, असे ईडीने न्यायालयाला सांगितले. त्यावर वाधवान यांच्या वकिलांनी कपिल व धीरज यांना ईडी कोठडीची आवश्यकता नसल्याचे म्हटले. मात्र, न्यायालयाने ईडीचा युक्तिवाद मान्य करत दोघांच्याही कोठडीत ८ मे पर्यंत वाढ केली.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here