IFSC गुजरातला हलवण्याच्या निर्णयावर मनसेची शिवसेनेवर सडकून टीका

मुंबई : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवेचं केंद्र मुंबईतून गुजरातला नेण्याचा मुद्दा आता चांगलाच तापू लागला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी टीका केल्यानंतर आता त्यांचा उल्लेख करत मनसे नेते किर्तीकुमार शिंदे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. ‘आदरणीय सुभाष देसाई साहेब, प्रस्तावित IFSC मुख्यालय मुंबईहून गुजरात-गांधीनगरमध्ये नेण्याची प्रक्रिया एका रात्रीत घडलेली नाही’, असं म्हणत नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधानपदी आले त्याचवेळी “मुंबईत #IFSC”चं महाराष्ट्राचं स्वप्न भंगल, हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. ‘५ वर्षं भाजपासोबत शिवसेनेचं सरकार होतं. भाजपसोबतच्या सरकारमध्येही तुम्ही राज्याचे उद्योगमंत्री होता. या काळात IFSC मुख्यालय गुजरातला न जाता महाराष्ट्रात राहावं, यासाठी आपण स्वतः आणि आपल्या पक्षाने- शिवसेनेने किती वेळा आवाज उठवला? त्यासाठी कोणता प्रशासकीय पाठपुरावा केला?’, असे प्रश्न शिंदे यांनी उपस्थित करत शिवसेनेवर जळजळीत टीका केली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
1:57 PM 02-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here