दिल्लीत एकाच इमारतीत एकाच वेळी ४१ जणांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : लॉकडाऊनसह विविध उपाययोजना केल्यानंतरही देशातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, दिल्लीतील कापसहेडा येथील ठेकेवाली गल्ली परिसरात असलेल्या एका इमारतील तब्बल ४१ जणांना एकाच वेळी कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, १९ एप्रिल रोजी येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने ही इमारत सील करण्यात आली होती. तसेच येथील सर्व लोकांचा कोरोना चाचणी करण्यासाठी नमुने घेण्यात आले होते. त्याचा अहवाल शनिवारी आला असून, त्यामध्ये या इमारतीत राहणाऱ्या ४१ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:26 PM 02-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here