रत्नागिरी : राजस्थानामधील कोटा येथे शिक्षणासाठी गेलेल्या रत्नागिरीतील १८ विद्यार्थ्यांना शनिवारी सकाळी रत्नागिरीत एस्. टी. बसने आणण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील १८ व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ विद्यार्थ्यांना रत्नागिरीत आणण्यात आले आहे. यामध्ये मंडणगड ९, खेड १, दापोली २, रत्नागिरी ६ आणि सिंधुदुर्ग ३ असे विद्यार्थी होते. सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी गेलेले महाराष्ट्रातील १८०० विद्यार्थी कोटा येथे लॉकडाऊनमुळे अडकले होते. या सर्व विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी चर्चा केली होती. या विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून आणण्यासाठी परिवहन मंत्री अॅड. अनिल परब आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनीही प्रयत्न केले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:55 PM 02-May-20
