सरकार अस्थिर करण्याचा ‘त्यांचा’ डाव फसला : जयंत पाटील

सांगली : संपूर्ण जग कोरोनाविरोधात लढत असताना राज्यातील विरोधी पक्षाचे नेते सरकार अस्थिर करण्यासाठी देव पाण्यात घालून बसले होते. परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानपरिषद निवडणुकीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने त्यांचे हे प्रयत्न फसले, अशी टीका जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली. राज्यात महाविकास आघाडीचे हे सरकार पुन्हा नव्या जोमाने काम करेल. तसेच कोरोनाविरोधातील लढाईत यशस्वी होणार आहे. महाराष्ट्राची आर्थिक प्रगती करण्यासाठीसुद्धा सरकार सक्षम असून त्यादृष्टीने प्रयत्न केले जातील, असंही ते म्हणाले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here