मुंबई : केंद्र सरकारने मुंबईतील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर अनेक स्तरावरून टीका होत आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर कायम टीका करण्यासाठी काही लोकांना केवळ सोयीच्या गोष्टींचे स्मरण होते, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. तसेच याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘आपलं आपयश लपवण्यासाठी तसंच एकही दमडीचं काम केलं नाही हे लपवण्यासाठी मोदी सरकारवर आरोप केले जात असल्याचा आरोप फडणवीसांनी केला.
