आदिवासी हेच मुळनिवासी, देशाचे खरे मालक : राहुल गांधी

0

वाशिम : या देशात सर्वप्रथम आदिवासीचेच वास्तव्य होते. तेच या देशाचे खरे मालक असून, त्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करण्यात येत आहे, असे प्रतिपादन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले,.

भारत जोडो पदयात्रेदरम्यान वाशिम तालुक्यातील बोराळा हिसे येथे बिर्ला मुंडा जयंतीच्या कार्यक्रमात १५ नोव्हेंबर रोजी ते बोलत होते. यावेळी त्यांनी क्रांतिवीर बिरसा मूंडा यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादनही त्यांनी केले. त्यांनी यावेळी १७ मिनिट भाषण केले .

संपूर्ण आदिवासी समाजाला एकत्र जोडून अलगुलाल करणारे क्रांतिवीर जननायक बिरसा मुंडा यांची जयंती १५ नोहेंबर रोजी भारत जोडो पदयात्रेकरिता जिल्हयात दाखल झाल्यानंतर खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात आली . वाशिम येथील बोरळा हिस्से फाटा येथे गुरुद्वारा जवळ दुपारी ३ वाजता झालेल्या या कार्यक्रमासाठी राज्यातील आदिवासींच्या विविध संघटनांचा सहभाग दिसून आला .

या कार्यक्रमाचे आयोजक अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. शिवाजीराव मोघे होते . जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या दिवशी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा वाशीममध्ये असल्याचा चांगला योगायोग जुळून आला आहे ही आमच्यासाठी आनंदाची बाब असून राहुल गांधी भारत जोडो चा संदेश देत जयंती कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून आदिवासी बांधवांशी संवाद साधला . आदिवासीच्या सामाजिक , , राजकीय प्रश्नावर हितगुज राहुल गांधी यांच्याशी करण्यात आले . यावेळी राज्यातून आदिवासी समाज बांधव उपस्थित झाला होता . यावेळी बिरसा मुंडा की जय अशा घोषणा देण्यात आले .यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार प्रज्ञा सातव, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, आमदार अमित झनक, जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आदि मान्यवर उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:01 PM 15/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here