रत्नागिरी : मुंबई-पुण्याच्या चाकरमान्यांना कोकणातील आपापल्या गावी घेऊन येण्यासाठी मंत्री आणि आमदारांनी कंबर कसली आहे. मात्र त्याबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. एकीकडे करोनाचा आजार पसरू नये, यासाठी जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त केला जात असताना मुंबई आणि पुणे या दोन्ही हॉटस्पॉटमधून चाकरमान्यांना आणण्यासाठी चाललेला आटापिटा ग्रामस्थांच्या संभ्रमात भर घालत आहे. मुंबई आणि ठाण्यातील दोघा चाकरमान्यांना कोकणात आल्यानंतर करोना झाल्याचे आजच स्पष्ट झाल्यामुळे ग्रामस्थ गोंधळून गेले आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:21 PM 02-May-20
