चिपळूण : चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी चिपळूण तालुक्यातील मालदोली, बिवली भागातील गावांना आज भेट दिली. करोनाप्रतिबंधक उपाययोजना, रेशन दुकानातील धान्यवाटप आणि परिसरातील विकासकामांबाबत श्री. निकम यांनी यावेळी चर्चा केली. प्रशासन आणि ग्रामस्थांनाही त्यांनी यावेळी सूचना केल्या. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळामुळे या परिसरात मोठे नुकसान झाले. त्याची पाहणी श्री. निकम यांनी केली. आंबा, काजू, घरांचे झालेले नुकसान यांच्या पंचनाम्यांबाबत त्यांनी सूचना दिल्या. योग्य ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
