पं. नेहरू-म. गांधींचे पणतू एकत्र येणार, तुषार गांधी अकाेल्यातून पदयात्रेत सहभागी हाेणार

0

अकाेला : भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांचे स्थान अढळ आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता अशा मूल्यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या या दाेन नेत्यांच्या विचारांचा वारसा त्यांच्या पिढीने पुढे चालविला असून आता या दाेन्ही नेत्यांचे पणतू भारत जाेडाे यात्रेत एकत्र येणार असल्याने जणू इतिहासाची पुनरावृत्ती हाेत असल्याचे चैतन्य काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पणतू काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सुरू केलेली भारत जाेडाे यात्रा विदर्भात दाखल झाली आहे. १७ नाेव्हेंबर राेजी ही यात्रा अकाेल्यातील बाग फाटा येथे मुक्कामी असेल तेथेच महात्मा गांधींचे पणतू प्रख्यात गांधीवादी विचारवंत तुषार गांधी हे राहुल गांधी यांची भेट घेऊन दुसऱ्यादिवशी त्यांच्यासाेबत शेगावपर्यंत पदयात्रा करणार आहेत. गांधी-नेहरूंच्या या दाेन्ही पणतूंची भेट भारत जाेडाे यात्रेमधील महत्त्वाचा क्षण असून या निमित्ताने लाेकशाहीवर निष्ठा असणाऱ्यांना आणखी बळ मिळेल, अशी भावना काँग्रेसच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 16/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here