नवी दिल्ली : काश्मिरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर गुरुवारी पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित केले. यामध्ये नरेंद्र मोदी यांनी या निर्णय जम्मू काश्मीरच्या जनतेच्या हिताचा असल्याचे सांगितले.
पंतप्रधान मोदींनी पुढे सांगितले की , “जम्मू काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका होतील. ३७० हटवल्यानंतर आता काश्मीरमध्ये सरकारी नोकऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. तसेच महिलांना सर्व काही सुरक्षेचे कायदे आणि कायद्यानुसार संरक्षण मिळणार आहे, दलितांनाही त्यांचे अधिकार लागू होणार आहेत.”
संसदेने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे सरदार वल्लभभाई पटेल , डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अटलजींचे स्वप्न साकार झाले. आता देशातील सर्व नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्ये समान झाली. यासाठी मी संपूर्ण देशवासियांना शुभेच्छा देऊ इच्छितो. आर्टिकल ३७० आणि ३५ अने देशाला एका कुटुंबाची एकाधिकारशाही, भ्रष्टाचार यासाठी प्रोत्साहनच दिले. आता जम्मू-काश्मीर आणि लडाखवासियांचा विकास होईल. तसेच, त्यांचे भविष्यही सुरक्षित होईल.
