सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार नाट्य कला ही लोकनाट्य परंपरेतील प्राचीन आणि समृद्ध कला म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर सातासमुद्रापार ओळखली जाते, पौराणिक कथा,गण, गौळण, विनोद यांचा आधार घेत मनोरंजन करतानाच सामाजिक प्रभोधन करण्याचे काम गेली कित्तेक वर्षे ही मंडळे करत आहेत.
धार्मिक उत्सव, जत्रा, सार्वजनिक कार्यक्रम, सार्वजनिक पूजा, तसेच इतर कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रम असोत दशावतार नाट्य आवर्जून सादर केले जाते.अशी अनेक मंडळे वर्षोनुवर्षे रसिकांचे मनोरंजन करत आहेत.या नाट्यमंडळातील अनेक कलाकारांचे प्रयोगातून मिळणारे मानधन आणि रसिकांनी दिलेली बक्षिसे हा मोठा आर्थिक आधार आहे.
मात्र या वर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने संचारबंदी लागू झाली आणि सर्वच धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली त्यामुळे दशावतार नाट्य मंडळांचे प्रयोग बंद झाले आणि मंडळांना फार मोठया आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागत आहे.या सर्व परस्थितीची दखल घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी मदतीचा हात पुढे केला आणि सुमारे चाळीस दशावतार नाट्य मंडळांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली.या वेळी संवेदनशील मनाच्या मंत्री महोदयांनी “दशावतार नाट्य मंडळांवर आलेले आर्थिक संकट मोठे असून माझ्या परीने फूल ना फुलाची पाकळी म्हणून दिलेले पाच लाख रुपये आपण स्वीकारावे हे दिवसही निघून जातील आपण पुन्हा नव्याने उभे राहू ” पालकमंत्री आणि शासन म्हणून मी सदैव तुमच्या सोबत आहे असे भावनिक आवाहन केले.
या कार्यक्रम प्रसंगी आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते,जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, अतुल रावराणे, संदेश पारकर, अशोक दळवी, विक्रांत सावंत, अतुल बगे, बबन राणे, रुपेश राऊळ, सागर नाणोसकर ,अमेय तेंडुलकर, शब्बीर मणियार, अपर्णा कोठावळे, प्रशांत कोठावळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
