चिपळूण : तालुक्यातील काल कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आलेला रुग्ण खांदाटपाली येथे वास्तव्यास आहे हे निष्पन्न झाल्यावर खांदाटपालीसह आजूबाजूचा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. या परिसरात जाण्यास किंवा येथून बाहेर पडण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. तसेच येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. येथून ३ किलोमीटर कंटेंटमेंट झोन आणि ५ किलोमीटर परिसरात बफर झोन अशी विभागणी करून पोलीस चेक नाके तयार करण्यात आले आहेत. प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. खांदाटपालीसह नवीन कोळकेवाडी, दळटवने, कलंबस्ते, वालोपे, खेड तालुक्यातील आंबडस, काडवली या गावांना कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे व ते क्षेत्र पूर्णपणे सील करण्यात आले आहे. तसेच खेर्डी, चिपळूण शहर, चिपळूण उपनगर, निरबाडे, पेढे तर खेड तालुक्यातील चिरणी, भेळसाई, केळणे, काडवली या ५ किमी परिसराचा बफर झोन अशी विभागणी करून पोलीस चेक नाके तयार करण्यात आले आहेत.
