कोविड योद्ध्यांना हवाई दलाकडून अनोखी मानवंदना

मुंबई : राज्यातील करोनाग्रस्तांवर दिवस रात्र उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारी आणि करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये आणि लोकांनी घरातच राहावे म्हणून जागता पहारा देणाऱ्या पोलिसांना हवाई दलाने आज अनोखी मानवंदना दिली. मुंबईच्या अनेक हॉस्पिटलवर हवाई दलाने सुखोई या लढाऊ विमानातून पुष्पवृष्टी केली. पुष्पवृष्टी सुरू झाली तेव्हा कोविड योद्ध्यांनीही रुग्णालयाबाहेर येऊन हात उंचावून हवाई दलाच्या या अनोख्या मानवंदनेचा स्वीकार केला. हवाई दलाच्या या आगळ्यावेगळ्या मानवंदनेमुळे कोविड योद्धेही भारावून गेले होते. आज सकाळी १० वाजून ७ मिनिटांनी एम१७ हेलिकॉप्टरमधून कस्तुरबा रुग्णालयावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाबाहेर येऊन हवाई दलाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर केईएम, जेजे हॉस्पिटल, नेव्ही हॉस्पिटल, नरिमन पॉइंट, मरिन ड्राइव्ह आणि वरळी आदी परिसरात लढाऊन विमानांनी घिरट्या घेत कोविड योद्ध्यांवर पुष्पवृष्टी केली. सुखोई २० या लढाऊ विमानाने राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनावरून फ्लाइंग मार्चही केला. त्यानंतर उत्तर-दक्षिण असा फेरफटका मारून तीन विमानांनी कोविड योद्ध्यांना सलामी दिली.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here