मुंबई : राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. गेल्या २४ तासात राज्यात एकूण ७९० नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १२,२९६ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात करोनामुळे ३६ जणांचा मृत्यू झाला आहे तर २१ रुग्णांनी करोनावर मात केली असून आतापर्यंत राज्यात २००० रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
