हर्नियाच्या दुर्मीळ आजारावर लाईफ केअरमध्ये शस्त्रक्रिया

0

चिपळूण : येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये एका ७५ वर्षीय महिलेवर हर्नियाच्या आजारावर दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

हॉस्पिटलचे जनरल आणि लॅप्रोस्कॉपिक सर्जन डॉ. इसहाक खतीब यांनी ही शस्त्रक्रिया केली.

काही दिवसांपूर्वी एक ७५ वर्षीय महिला पोटदुखी व उलट्या इ. तक्रारी घेऊन लाईफ केअर हॉस्पिटलच्या डॉ. इसहाक खतीब यांच्याकडे आली. सोनोग्राफी केल्यानंतर आतड्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्याचे दिसले. यानंतर पोटाचे सिटी स्कॅन करण्यात आले असता ऑब्स्ट्रॅक्टेड ऑब्च्युरेटर हर्निया असल्याचे आढळून आले. रुग्णाचे वय व तिची नाजूक शारीरिक स्थिती पाहता करावे लागणारी शस्त्रक्रिया ही अतिशय गंभीर होती. परंतु, तिचा जीव वाचविण्यासाठी डॉ. इसहाक खतीब यांनी तिच्या नातेवाईकांशी चर्चा करून ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. तसेच पूर्ण ओपन ऑपरेशन केल्यामुळे रुग्णाला होणार त्रास कमी करण्यासाठी व जीवाला असणारा धोका टाळण्यासाठी दुर्बिणीद्वारे सदर ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेनंतर दोनच दिवसांत रुग्णाच्या सर्व तक्रारी दूर झाल्या. पाचव्या दिवशी रुग्ण सुखरूप घरी गेला. अशीच तत्परता, काळजी लाईफ केअरचे प्रत्येक डॉक्टर सर्व रुग्णांच्या बाबतीत घेतात, असे प्रतिपादन लाईफ केअर हॉस्पिटलच्या डॉ. इसहाक खतीब यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here