रत्नागिरी, ८ ऑगस्ट, (हिं. स.) : अतिवृष्टी आणि पुरामुळे कालपासून रत्नागिरीसह जिल्ह्यात निर्माण झालेली पेट्रोलची टंचाई उद्या (दि. ९ ऑगस्ट) दूर होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी शहरातील पेट्रोल पंप सध्या पेट्रोल संपल्यामुळे बंद आहेत. परंतु आता परिस्थितीत सुधारणा होत असून मिरज येथील डेपोमधून टँकर निघाले आहेत. मिरज येथील डेपोपर्यंत जाण्यासाठी कराड येथूनही मार्ग आता उपलब्ध झाला आहे. आंबा घाटातूनही अत्यावश्यक सेवांना प्राधान्य देण्याचे धोरण जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवले आहे. याशिवाय वाशी येथील डेपोमधूनही पेट्रोलचे टँकर येत आहेत. हे टँकर उद्यापर्यंत रत्नागिरीत दाखल होती. त्यानंतर रत्नागिरीतील सर्व पंपांवर पेट्रोल उपलब्ध होईल, असे महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध तसेच गांधी पेट्रोल पंपाचे मालक जयु शेठ गांधी यांनी सांगितले
