चेहऱ्यावर जखमा, तीन दिवस रुग्णालयात उपचार; श्रद्धाचा नवा फोटो समोर..

0

मुंबईची श्रद्धा वालकर हत्याकांडात रोज नवीन खुलासे होत आहे. दिल्ली पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासाठी तपास सुरू केला आहे.

आफताबने श्रद्धाचा मृतदेह ठेवण्यासाठी फ्रीजचा वापर केला होता. आता दिल्ली पोलीस आफताबची चौकशी करण्यासाठी नार्को टेस्ट करणार आहे. आज श्रध्दाचा एक नवा फोटो समोर आला आहे. या फोटोत श्रध्दा जखमी असल्याचे दिसत आहे.

हा फोटो 2020 मधील आहे, यावेळी आफताबने श्रद्धाला मारहाण केली होती. यानंतर श्रद्धाला 3 दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. असा आरोप श्रद्धाच्या मित्रांनी केला आहे. या फोटोत श्रद्धाच्या चेहऱ्यावर जखमा दिसत आहेत. इतके दिवस श्रद्धाने आफताबचा अत्यार तिने का सहन केला असा सवाल आता तिचे मित्र करत आहेत.

श्रद्धा खून प्रकरणाचा तपास दिल्ली ते मुंबईपर्यंत सुरू आहे. दरम्यान, मुंबईत भाड्याने फ्लॅट घेताना आफताब आणि श्रद्धा यांनी स्वत:ला पती-पत्नी असल्याचे सांगून भाडे करार केल्याचे समोर आले आहे. फ्लॅट मालकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये खूप भांडण व्हायचे, दोघेही बिल्डिंगखाली भांडायचे. आफताब आणि श्रद्धा यांच्यात झालेल्या भांडणाची माहिती शेजाऱ्यांना झाली होती.

आफताबला ना खेद ना खंत, लॉकअपमध्ये शांत…

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला अजूनही पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. आफताबचा खोटेपणा सतत समोर येत आहे. त्याने इतक्या धूर्तपणे खून केला आहे की, तो न्यायालयात सिद्ध करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याला श्रद्धाची हत्या केल्याचा अजिबात पश्चात्ताप नाही. तो लॉकअपमध्ये शांतपणे झोपतो.

श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याने शीर जाळण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने सांगितले. हत्येनंतर बाहेरून खाद्यपदार्थ मागवून त्याने मृतदेहाशेजारीच ते खाल्ले; शिवाय तो अधूनमधून श्रद्धाच्या शिराला मेकअपही करायचा, असेही चौकशीत पुढे आले आहे.

आफताबची कबुली

आफताबने जेथून फ्रिज विकत घेतले, त्या दुकानमालकाचा जबाब आणि बिल.
जंगलात सापडलेले अवयव आणि किचनमध्ये सापडलेले रक्त.
आफताबने श्रद्धाच्या बँक खात्यातून ५४ हजार रुपये काढल्याचा तपशील.

मृतदेहाची खांडोळी आणि वेब सीरिज पाहिली
श्रद्धा वालकरच्या मृतदेहाची खांडोळी करायला आरोपी आफताब पूनावाला याला सुमारे १० तास लागले. काम संपवून त्याने बीअर आणली, मग नेटफ्लिक्सवर वेब सीरिज पाहिली आणि झोपी गेला.

हत्येला सहा महिने उलटून गेल्याने पुरावे गोळा करण्याचं आव्हान

आफताबला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस पुरावे गोळा करण्यात गुंतले आहेत. हत्येला सहा महिने उलटून गेल्याने पुरावे गोळा करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. आफताबने कोणत्या शस्त्राने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले, याचा पोलीस शोध घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोलीस याबाबत आफताबची चौकशी करत आहेत, मात्र तो सातत्याने पोलिसांची दिशाभूल करत आहे. आता पोलीस आफताबच्या चॅटचा शोध घेत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:07 PM 18/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here