लोकसहभागातुन कोदवली-अर्जुना नद्यांतील गाळ उपशासाठी २२ नोव्हेंबरला नियोजन बैठक

0

राजापूर : शहरातील कोदवली-अर्जुना नद्यांतील गाळ उपशासाठी नाम फाऊंडेशनने तयारी दर्शविली असून राजापूर नगर परिषद, महसूल प्रशासन आणि लोकसहभागातुन हा गाळ उपसा केला जाणार आहे.

याच्या नियोजनासाठी मंगळवारी २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीला सर्व सामाजिक संघटना, राजकिय पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि राजापूर वासीयांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रांताधिकारी तथा राजापूर शहर गाळ निर्मुलन समितीच्या अध्यक्षा वैशाली माने यांनी केले आहे.

शहरातील कोदवली-अर्जुना नद्यांतील गाळ उपशासाठी नाम फाऊंडेशनने तयारी दर्शविल्यानंतर आता याच्या नियोजनासाठी प्रांताधिकारी वैशाली माने यांच्या अध्यक्षतेखाली राजापूर शहर गाळ निमुर्लन समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची बैठक शुक्रवारी प्रांताधिकारी माने यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात झाली. या बैठकीत २२ रोजी नाम फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसह नगर परिषद, महसुल प्रशासन व नागरिक यांची बैठक होणार असून याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी लोकसहभागातुन गाळ उपसा केला जाणार असून आपणा सर्वांना जास्तीत जास्त योगदान देऊन लोकवर्गणी जमा करावी लागणार आहे. त्यामुळे त्याबाबत नियोजन करण्याबाबत सुचना माने यांनी यावेळी दिल्या. गाळ उपशासाठी नाम फाऊंडेशन यंत्रसामुग्री व मनुष्यबळ पुरविणार असून त्यासाठी इंधन आणि कामगारांची रहाण्याची व जेवण व्यवस्था करावयाची असून त्याबाबत नियोजन करण्याचे निश्चित करण्यात आले.

या उपक्रमांत राजापूर शहरासह ग्रामीण भागातील सर्व जनतेला सहभागी करून घेण्यात येणार असून सर्व संघटना, उद्योजक, परदेशात असणारे राजापूर वासीयांनी यांनी यासाठी योगदान द्यावे अशी अपेक्षा असून त्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.या बैठकीला राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा गाळ निमुर्लन समितीचे सचिव प्रशांत भोसले, समिती सदस्य शंतनु दुधाडे, डॉ. उत्तम प्रभुदेसाई, संजय ओगले, दिनानाथ कोळवणकर, निलेश पाटणकर, महेश शिवलकर, नरेंद्र मोहिते, प्रकाश गुरव, पंचायत समितीचे नाटेकर आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:07 PM 18/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here