सोनपात्रा नदी प्रदूषण मुक्त करा; मानवाधिकारचे राज्य उपाध्यक्ष किरण तायडे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

0

खेड : खेड तालुक्यातील लोटे, घाणेखुंट, कोतवली या गावांना लागून वाहणारी सोनपात्रा नदी लोटे एमआयडीसी मधील कंपन्यांमधील केमिकल युक्त पाणी या नदी पात्रा मध्ये सोडण्यात येत असल्याने या नदीला प्रदूषणाचा विळखा पडून नदी पात्र प्रदूषित झाले आहे. ही नदी प्रदुषण मुक्त करा, असे आशयाचे निवेदन मानवाधिकार संघटनेचे सामाजिक न्याय विभागाचे किरण तायडे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रारी चे निवेदन सादर करून साकडे घातले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खेड दौऱ्यावर आले असता किरण तायडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नदी पात्राची स्थिती शिंदे यांच्या कानावर घालून कारवाई करण्याचे निवेदन सादर केलेलोटे मधील कंपन्या मधील केमिकलयुक्त पाणी सी ई टी पी कडे शुद्धीकरण प्रक्रियेसाठी देणे गरजेचे आहे, मात्र पैसे वाचवण्यासाठी लोटे एमआयडीसी येथील काही कंपन्यां हे पाणी थेट नाल्यांमध्ये सोडतात व तेच पाणी सोनपात्रा नदी व पुढे वशिष्ठी नदी येथे जाते. यामुळे सोनपात्रा नदी चे पाणी पूर्णपणे दूषित बनले आहे.

या नदी पात्रा मध्ये मासे राहिलेले नाहीत तसेच मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी असल्याने शेवाळ देखील नदीत जगत नाही. केमिकलयुक्त पाण्यामुळे येथील मासेमारी संपुष्ठात आली असल्याने मासे पकडून गुजारा करणाऱ्या भोई समाज बांधवा समोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे तर येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे गुरे ढोरे यांच्यासाठी पाणी कोठून आणायचे हा देखील प्रश्न आहे. केमिकल पाण्यामुळे शेती देखील पूर्णपणे नष्ट झाली आहे. या केमिकल युक्त पाण्यामुळे लोटे, घाणेखुंट, कोतवली या परिसरात कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याबाबत आपण योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी तायडे यांना दिले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:47 PM 18/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here